काल या समितीने काही अहवाल दिले आहेत ज्यामधे समितीने परीक्षा कश्याप्रकारे घ्याव्यात आणि पुढील वार्षिक वर्षाचे वेळापत्रक कसे असावे हे सांगितले. ह्या समितीनुसार परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी काही अडचणी येत असल्याचे समितीने म्हंटले आहे.
युजीसी समिती च्या शिफारशी
- शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ अध्यापनाचे कामकाज हे १ ऑगस्ट पासून द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचे व प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे सत्र हे १ सप्टेंबर पासून सुरु करण्यात यावे.
- प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट ह्या दरम्यान सुरु व्हाव्यात अशी शिफारस युजीसी समितीने केली आहे.
- विद्यापीठानी शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ मधील यूजी आणि पीजी प्रवेश प्रक्रिया ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पुर्ण करुन घ्याव्यात .
- शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ मधील हिवाळी परीक्षा ह्या १ जानेवारी ते २५ जानेवारी २०२१ दरम्यान व्हाव्यात, तसेच उन्हाळी सत्राचे अध्यापनाचे कामकाज हे २७ जानेवारी पासून सुरु व्हावे असे ह्या समितीने म्हंटले आहे.
- शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ मधील उन्हाळी परीक्षा ह्या २६ मे ते २५ जून २०२१ ह्या दरम्यान नियोजित कराव्यात व् उन्हाळी सुट्ट्या ह्या १ जुलै ते ३० जुलै ह्या वेळेत द्याव्यात अशी शिफारस ह्या समितीने केली आहे.
- शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ हे १ ऑगस्ट २०२१ पासून सुरु व्हावे.
सोशल डिस्टेंसिंग आणि शिक्षण !
सामाजिक अंतराचे महत्व लक्षात घेता विद्यापीठांनी योग्य ती पावले उचलावित यासाठी विद्यापीठांनी आभासी प्रयोगशाळा (Virtual Laboratories) व रेकॉर्डेड केलेले विसुअल्स विद्यार्थ्यांना द्यावेत ज्याने सोशल डिस्टेंसिंग पाळण्यात यश मिळेल. विज्ञान / अभियांत्रिकी / तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व्हर्च्युअल प्रयोगशाळांसाठी मानवी संसाधन विकास मंत्रालयाने (Human Resource Development Ministry) प्रदान केलेल्या संकेतस्थळांचा यासाठी वापर केला जाऊ शकतो असे समितीने म्हंटले आहे.
भविष्यात अश्या प्रकारच्या आव्हानांवर मात करण्यासाठी, प्राध्यापकांना आयसीटी व ऑनलाईन अध्यापनाच्या साधनांचे पुरेसे प्रशिक्षण हे शिक्षकांना मिळाले पाहिजे, जेणेकरून ते अभ्यासक्रमातील २५ % ऑनलाईन आणि ७५ % अभ्यासक्रम हा ऑफलाइन पद्धतीने पूर्ण करतील.
गतवर्षातील परीक्षांबाबत निर्णय ?
युजीसी समिती लवकरच परीक्षांबाबत राज्य सरकारांना कळविण्यात येईल त्या प्रमाणे पुढील निर्णय हा मा.राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत घेण्यात येईल असे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.उदय सामंत यांनी म्हंटले आहे. येत्या ८ दिवसांत याबाबत निर्णय होईल असेही ते म्हणाले.
![]() |
| छायाचित्र : सकाळ टाइम्स |


Comments
Post a Comment